दिवाळी संध्या 1

दिवाळी संध्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने ‘दिवाळी संध्या’ या श्रेष्ठ संगीतकार व गायक श्री. श्रीधर फडके यांच्या ‘बाबुजी आणि मी’ या सुमधुर आणि अजरामर मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर, महापौर डॉ.कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे आदी पदाधिकारी मान्यवर त्याचप्रमाणे पनवेलचे रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.